You are currently viewing केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे

मुंबई :

कोरोनाचा वाढता कहर पाहता आत्ता पर्यंत
अनेक नेत्यांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. ‘काल मला अशक्तपणा जाणवत होता त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर मी जेव्हा तपासणी करुन घेतली तेव्हा मी कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे मला समजले. मी सध्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांमुळे बरा आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलेले आहे. माझं सर्वांना एकच सांगणं आहे की, जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सावधगिरी बाळगून प्रोटोकॉलचे अनुसरण करा. सुरक्षित रहा.’

प्रतिक्रिया व्यक्त करा