You are currently viewing अटल प्रतिष्ठानमध्ये राष्ट्ररत्न अटलजींची जयंती साजरी

अटल प्रतिष्ठानमध्ये राष्ट्ररत्न अटलजींची जयंती साजरी

सावंतवाडी :

भारताचे भूतपूर्व पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जंयती अटलजीनां मनोभावे वंदन करून साजरी करण्यात आली.

माजी सैनिक व अटल प्रतिष्ठानचे माजी खजिनदार श्री महादेव लिंगवत यांच्या हस्ते अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड.नकुल पार्सॅकर यानी या जिल्ह्यात सातत्याने गेली वीस वर्षे अटलजी सारख्या देशातील सर्वसमावेशक नेत्याच्या नांवाने स्थापन केलेल्या न्यासाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक, समुपदेशन, करीअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रात उपक्रम सुरू असून त्याचा उपयोग समाजातील अनेक घटकांना होत असून अटलजींचा निस्सीम भक्त म्हणून हे सातत्य राखण्याचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेहमीचं राहिलं अशा भावना व्यक्त करून अटलजींचे स्मरण केले.

यावेळी अटल प्रतिष्ठानचे कार्यकारीणी सदस्य श्री प्रसाद महाले, सहकार्यवाह अँड. सौ.अनुराधा परब, खजिनदार श्रीमती अर्पिता वाटवे, सामाजिक कार्यकर्त्यां सौ.मानसी परब, माजी सैनिक व कौशल्य विकास विभागाचे लेखापाल श्री नामदेव सावंत, एस एस संगणक प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री रघुनाथ तानावडे, कु.रविंद्र विरनोडकर, कार्यालयीन प्रमुख कु.ज्योती राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा