सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्रमांक ४ मधून विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांचा सावंतवाडी वकील संघटनेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ॲड. सायली दुभाषी या वकील क्षेत्रात गेली काही वर्षे कार्यरत आहेत.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर, ॲड. दिलीप नार्वेकर, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. सुमित सुकी, ॲड. संकेत नेवगी, ॲड. स्वप्निल कोलगावकर, ॲड. सुप्रिम परब, ॲड. वैभव चव्हाण, ॲड. प्रितेश सावंत, ॲड. प्रिया भावे, ॲड. प्रणव आंबिये आदी उपस्थित होते.
