You are currently viewing कणकवली तालुक्यात पूरस्थिती, आमदार नितेश राणे यांनी पाणी भरलेल्या ठिकाणी दिली भेट

कणकवली तालुक्यात पूरस्थिती, आमदार नितेश राणे यांनी पाणी भरलेल्या ठिकाणी दिली भेट

आचरा रोड-वरवडे येथे जाऊन पूरस्थितीची केली पाहणी

*जानवली,गडनदीला पूर केटी गेले पाण्याखाली

कणकवली

कणकवली तालुक्याला शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार मुसंडी मारल्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत अनेक रस्ते पाण्याखाली गेले वाहतूक विस्कळीत झाली आजरा कणकवली मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला. याबाबतची माहिती भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांना कळताच वरवडे येथे फणस नगर येथे जावून पूरस्थितीची पाहणी केली. पावसाचा जोर वाढल्यास नजीकच्या वस्तीत पाणी घुसल्यात सावधानता म्हणून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाकडून घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करून दिवस-रात्र सावध राहा,सतर्क रहा आणि पाणी वाढल्यास वस्तीत येत असल्यास सुरक्षित ठिकाणी जा अशा सूचना ही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केल्या.

शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीला पूर आल्याने लगतच्या भागांना पुराचा वेढा पडला. जानवलीनदीला पूर आल्यामुळे आचरा मार्गावर पाणी भरले.त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तंडुब झाले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यासह जोरदार तडाखा दिला. परिमाणी जानवली व गडनदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जानवली नदीचे पाणी आचरा रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकारी सुट्टी
जाहीर केली होती. मात्र,शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे याठिकाणी असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही मागे फिरावे लागले. गडनदीवरील केटी बंधारे वरून पाणी वाहत आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा मंडळ नजीक असलेल्या केटीबंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे ओढके बंधाऱ्यात अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे हे ओढके बंधाऱ्याला आढळत असल्याने बंधारा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओढके काढून टाकण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा