हुमरमळा (वालावल) गावातील महीलांनी पुढाकार घेत बांधले बंधारे!
सरपंच श्री अमृत देसाई, सौ अर्चना बंगे, सौ मानसी वालावलकर यांचा पुढाकार!
कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल गावातील महीला बचत गट आणि ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य यांच्या पुढाकाराने गावातील पाणी अडवण्यासाठी कच्चे बंधारे बांधून गावातील बागायती शेती साठी पाण्यांची व्यवस्था केली आहे
हुमरमळा वालावल गावातील सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, माजी सरपंच सौ अर्चना बंगे, महीला बचत गटांच्या प्रतिनिधी सौ मानसी वालावलकर व ग्रामपंचायत सदस्य सौ हेमांगी कद्रेकर यांच्या पुढाकाराने ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवुन छोटे छोटे कच्चे बंधारे बांधून शेतक-यांना लाभ होईल अशा प्रकारे हे बंधारे बांधले जात आहेत
ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महीला कायमच सामाजिक क्षेत्रात सहभाग घेऊन सौ अर्चना बंगे यांच्या महीलांच्या एकजुटीचा फायदा गावातील सामाजिक कामात सहकार्य मिळत आहे
आज यावेळी श्रीमती सुक्ष्मा वालावलकर, दर्शना मार्गि, अंकिता परब, हीताली गुंजकर, समिक्षा परब, सौ राणे, सौ माड्ये, सौ परकर, शर्मिला आरोलकर, हेमांगी कद्रेकर व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या
