महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी श्री. विजय मारुती जांभळे तसेच उपाध्यक्ष पदी श्री. गजानन राजेंद्र राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर बोलताना श्री. विजय जांभळे व श्री. गजानन राऊळ यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतुकीशी संबंधित गंभीर प्रश्न, परिवहन विभागाचा मनमानी कारभार तसेच वाहन व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येतील. जिल्ह्यातील वाहन व्यावसायिकांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेना नेहमी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला वाहतुकीच्या संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा जोमाने कार्यरत होऊन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी नमूद केले.
वाहतुकीसंदर्भातील कोणतेही प्रश्न अथवा तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : 9307119911 / 7020858275
