You are currently viewing मारुती मंदिर, फोंडाघाट मध्ये २१ सप्टेंबर रोजी सात प्रकाराचे “अखंड हरिनाम पारायण”

मारुती मंदिर, फोंडाघाट मध्ये २१ सप्टेंबर रोजी सात प्रकाराचे “अखंड हरिनाम पारायण”

अखिलेश फाळके आणि शुभम पाळेकर यांच्यात ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना —

फोंडाघाट

दरवर्षीप्रमाणे फोंडाघाट मारुती मंदिर मधील “सात प्रहराचे अखंड हरिनाम पारायण ” बुधवार तारीख २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सकाळी दहा वाजता घटस्थापना,आरती,शालेय भजने, जीवन विद्या मिशन फोंडाघाट चा उपासना यज्ञ, हरिपाठ, स्थानिक भजने आणि रात्र १० वाजता पडेलकर प्रासादिक भजन मंडळ, घालवली- देवगड येथील बुवा अखिलेश फाळके आणि मलवीर भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, पालेकरवाडी येथील बुवा शुभम पालेकर यांचे मध्ये ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. पहाटे चार ते सात दरम्यान काकड आरती व घटविसर्जन होईल.

आकर्षक विद्युत रोषणाई आणि भरगच्च कार्यक्रम यामुळे आणि राधाकृष्ण मंदिरातील “अखंड हरिनाम सप्ताह” ची शेवटची रात्र असल्याने,पंचक्रोशीतील भाविकांनी, चाकरमानी, माहेरवाशींनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन सावंत- पटेल परिवार आणि आयोजकांतर्फे करण्यात आले आहे….

प्रतिक्रिया व्यक्त करा