You are currently viewing सावंतवाडीचे मुख्याधिकारी संतोष कुमार जिर्गे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची जपली मैत्री.

सावंतवाडीचे मुख्याधिकारी संतोष कुमार जिर्गे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची जपली मैत्री.

सावंतवाडीचे मुख्याधिकारी संतोष कुमार जिर्गे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची जपली मैत्री.

सावंतवाडी

नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा थोडक्याचं मताने पराभव झाला. यावेळी तरी बबन साळगावकर निवडून आले पाहिजे होते असे भावनिक उद्गार काढून शहरवासीयांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यानंतर शहरातील शेकडो नागरिक बबन साळगावकर यांच्या भेटीला आले तर नगरपरिषदेचे सफाई कामगार तसेच कर्मचारी म्हणाले साळगावकर साहेब आम्ही तुमची वाट पाहत होतो. एवढं प्रेम आणि आपुलकी पाहून साळगावकर भावूक झाले होते.
आपली मैत्री जपत मुख्याधिकारी संतोष कुमार जिरगे काल सायंकाळी साळगावकर यांच्या गुरुकुल मध्ये भेट घेतली.  व पराभवाने खचून जाऊ नका तर याही पुढे अधिक जोमाने सामाजिक कार्यामध्ये सक्रिय व्हा तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची या शहराला खूप गरज आहे असा मौलिक सल्ला दिला. बबन साळगावकर यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी नगरपरिषद कर्मचारी दीपक म्हापसेकर व बंड्या तोरस्कर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा