श्री स्वामी समर्थ मठाचा 24 डिसेंबर रोजी वर्धापन दिन सोहळा!
कुडाळ
श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू . सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट,
या मठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त सकाळी ८ : ०० वा.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती वरती आणि पादुकांन वरती अभिषेक, सकाळी १० : ३० वा. अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा,सकाळी ११ : ०० वा. महाआरती, दुपारी १२ : ३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन,
दुपारी १ : ०० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना भाविक -भक्तांन कडून नैवेद्य अर्पण, दुपारी १ : ३०वा.महाप्रसाद-अन्नदान, सायं. ६ : ०० वा. श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ – ओरोस
बुवा – श्री ज्ञानदेव मेस्त्री ( विठुदास ) यांचे सुस्वर भजन, रात्रौ. ९:०० अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण वेंगुर्ला यांचा ‘लेक माझी तुळजाभवानी’
हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात येत आहे.
