*सौ. मनीषाताई सिद्धार्थ तापकीर यांच्या उमेदवारीसाठी ग्रामस्थांचे विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात साकडे*
पिंपरी
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सौ. मनीषाताई सिद्धार्थ तापकीर यांना उमेदवारी मिळावी म्हणून रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी चऱ्होली गावातील ऐतिहासिक विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात आजी – माजी नगरसेवक, समाजधुरीण यांच्यासह सर्व वयोगटातील सुमारे पाचशेहून अधिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन साकडे घातले. आजपर्यंत गावाच्या कल्याणासाठी जेव्हा जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा चऱ्होली गावातील समस्त ग्रामस्थ विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात एकत्र येऊन एकमताने, एकदिलाने निर्णय घेतात, असा पूर्वापार प्रघात आहे. त्यानुसार यावेळीदेखील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी चऱ्होली गावातील पाटिलकीची धुरा सांभाळणारे लक्ष्मण गणपत तापकीर यांची नातसून आणि ह. भ. प. भानुदासमहाराज तापकीर यांची स्नुषा, सामाजिक कार्यकर्ते, पैलवान सिद्धार्थअप्पा तापकीर यांची सुविद्य पत्नी तसेच सुप्रसिद्ध इतिहासअभ्यासक संदीपआबा तापकीर, युवानेते श्रीकांतअण्णा तापकीर, सामाजिक कार्यकर्ते सारंगनाना तापकीर यांची भावजयी सौ. मनीषाताई तापकीर यांच्या उमेदवारीसाठी मंदिरात एकवटले होते. सौ. मनीषाताई यांची उमेदवारी म्हणजे परिसरातील संपूर्ण जनतेचा आधार आणि विकासाचे प्रतीक असल्याची भावना याप्रसंगी जनसमुदायाने व्यक्त केली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
