मालवण :
मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेना आघाडीवर असून नीलेश राणे यांचा करिष्मा स्पष्टपणे दिसून येत आहे. नगराध्यक्षपदाच्या लढतीत पहिल्या फेरीअखेर शिंदेसेनेच्या ममता वराडकर या १७२ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या शिल्पा खोत पिछाडीवर पडल्या आहेत.
दरम्यान, भाजपचे दर्शना कासवकर व मंदार केणी विजयी झाले असून, शिंदेसेनेचे दीपक पाटकर आणि नीना मुंबरकर यांनीही विजय मिळवला आहे.
भाजपचे ललित चव्हाण व उबाठा गटाच्या अनिता गीरकर विजयी ठरले आहेत.
भाजपच्या यतीन खोत यांना पराभवाचा धक्का बसला असून, भाजपच्या महानंदा खानोलकर आणि उबाठा गटाच्या महेंद्र म्हाडगूत यांनी विजय नोंदवला आहे.
