You are currently viewing कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगली बाल काव्यमैफल

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगली बाल काव्यमैफल

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगली बाल काव्यमैफल-*

पुणे

नक्षत्राचं देणं काव्यमंच व पिंपरी चिंचवड मनपा(शिक्षण विभाग प्राथमिक )
आयोजित…बाल काव्य मैफल 2025 पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची विशेष अनोखी काव्य मैफल आयोजित केली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत करण्यात आले.

कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ कवी व साहित्यिक तुकाराम पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम प्रमुख पाहुणे
संगीता बांगर ( प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा )विशेष उपस्थित श्रीकांत चौगुले( ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, समन्वयक ), कवी वादळकार,पोलीस कवी विनायक विधाटे, कवी सुरेशचंद्र चनाल, गायक सुभाष चव्हाण,मुख्याध्यापिका सुनीता विधाटे, जुई यादव,सर्व विद्यार्थी सहभागी पालक इ. उपस्थित होते.

कार्यक्रम अध्यक्ष तुकाराम पाटील म्हणाले, ” आजचा कार्यक्रम म्हणजे बाल मनाला काव्याचा फुलोरा आणणार आहे. भविष्यातील अनेक कवी नक्कीच या व्यासपीठावर घडतील अशी शाश्वती आहे. अनेक बालकवींनी सादर केलेल्या कविता अतिशय सुंदर आहे. या कवींना मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता आहे. भविष्यामध्ये काव्य बद्दलच्या कार्यशाळा घेणे अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवड कवितेच्या राजधानीत हा सोहळा अतिशय भारदारपणे संपन्न झाला आहे.”

श्रीकांत चौगुले आपल्या मनोगतात म्हणाले की, ” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 100 शाळांमध्ये एक तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे संपन्न झाला आणि कवी लिहिते झाले आजचा कार्यक्रम त्या लिहिणाऱ्या बालकवींसाठीच संपन्न झाला आहे. कवितेची बीजे मुलांच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे रुजली आहेत आणि पुढे भविष्यात चांगले कवी लेखक तयार होतील याची खात्री आहे. संवेदना जपल्याने बालमन जागृत झाले आहे. लवकरच बालकाव्यसंग्रह प्रकाशाचा संकल्प सुद्धा आहे. ”

पाहुण्यांना शाल व बुक देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व सहभागी बालकवींना आकर्षक फोर कलर सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड मनपा कन्या शाळा, चिंचवड स्टेशन, पुणे 19 येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात बाल काव्य मैफल संपन्न झाली.

कर्मयोगी संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त हा उपक्रम पिंपरी चिंचवड मनपाच्या प्राथमिक शाळेतील बाल विद्यार्थ्यांसाठी संपन्न करण्यात आला. बालकवींनी विविध विषयावर आपल्या स्वतःच्या रचना सादर करून मैफलीत रंगत आणली.

या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नक्षत्राचं देणं काव्यमंच )यांनी विनामूल्य केले होते

कार्यक्रमाची सांगता
विश्वगीत पसायदानाने करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा