दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यक्रम; अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक विजय शिवराम पांचाळ
कणकवली / तळेरे :
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांचे वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२५–२६ शुक्रवार दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. विजय शिवराम पांचाळ (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग) हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रविंद्र कांतिलाल जठार (माजी माजी वित्त व बांधकाम जि. प. सिंधुदुर्ग), मा. श्री. नागेश रामचंद्र मोरये (अध्यक्ष, नांदगाव पंचक्रोशी माध्य. शिक्षण संस्था, नांदगाव), मा. श्री. सुकांत कीर्तिकुमार वरुणकर (उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खारेपाटण) आणि मा. श्री. अशोक विठ्ठल तळेकर (अध्यक्ष, पंचक्रोशी विद्यालय, गवाणे) उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. हनुमंत भास्कर तळेकर (सरपंच, ग्रा. पं. तळेरे), मा. श्री. संदीप आत्माराम घाडी (उपसरपंच, ग्रा. पं. तळेरे), मा. श्री. नारायण (नाना) रामचंद्र शेटये (उपसरपंच, ग्रा. पं. वारगांव) तसेच मा. श्री. माधव शंकर कुडतरकर (अध्यक्ष, अरविंद सावंत सरदार मा. वि., नाधवडे) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमामध्ये ईशस्तवन, स्वागतगीत, प्रास्ताविक, अहवाल वाचन, पारितोषिक वितरण, विविध मान्यवरांची भाषणे, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन व राष्ट्रगीत होणार आहे.
शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून दुपारी १२ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद कार्यक्रम व महाप्रसाद होणार आहे.
हा कार्यक्रम वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे येथील डॉ. श्री. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे होणार असून पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

