You are currently viewing उघडा नयन देवा आता
Oplus_16908288

उघडा नयन देवा आता

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🙏 उघडा नयन देवा आता🙏*

 

 

उघडा नयन देवाआताजोडतो

दोन्ही कर

चोहो बाजू चाले जरी तव

नाम गजर,

माणुसकी सोडून चाललाआहे

रे कहर

जगी काय चालले आहे पहा

तू समोर.

 

सारी चाललीआहेइथेआंधळी

कोशिंबीर

कोण कुणा लुटतो आहेत्याची

ना खबर,

सारी माणुसकीबसलीआहेकां

धाब्यावर

निर्लज्ज पणाचा कळस,आळ

कुणावर?

 

जागाहो रे विठूराया आताहात

कटीवर

थबकली कां रे तुझी पाऊलेच

विटेवर,

जग चालले आहे,विध्वंसाच्या

लाटेवर

कमल नेत्र तव उघडून पहा या

सृष्टीवर.

 

विधात्यातू निर्मिली सृष्टीसारी धरेवर

सद् बुद्धी दिली तरी का होतो

अत्याचार,

मानवाची वृत्तीला का येई दानवी सर

मतीमंद कांझाली,येती राक्षसी

अविचार.

 

ऐकता वृत्तभयानक जीवकापे

थरथर

कसे जगावे एक महागाईचा

भस्मासूर,

पिसाटती नराधमजाहलेजगणे

हे भेसूर

पिसाळली श्वापदेयेतीघरीदारी

रस्त्यावर.

 

कसे वाटते देवा तुला पहा ना

क्षणभर

कुठेचाले विध्वंसकुठेविस्फोट

भयंकर,

अवकाळीपाऊस,पिकेनष्टवंत

उपासमार

धाव देवापृथ्वीवर सर्वांसद्बुद्धी दे सत्वर.

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर कलाशिक्षिका

प्रतिक्रिया व्यक्त करा