*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पडे भुरळ मनाला*
अधरावरती तो पावा
स्वर मोहित करुनी गेला
आपसूक पाऊले वळली
भुरळ पडे मनाला…..
गूढ अगम्य निळाईचे
काळ्या यमुनेला ठावे
सावळे रूप सुकुमार
अंत:करणी भेदावे…
रुणझुणले नुपूर पायी
कळले ओल्या पातीला
कुंजवनी मोहुनी आली
भाळली दिव्य बासरीला..
दिसता समोर गिरीधारी
तल्लीन राधिका झाली
ओढीने मनमोहनाच्या
प्रीतीच्या चांदणी न्हाली…!!
०००००००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
