शिरगाव ‘समर्थ’ ग्रामसंघाचा सामाजिक उपक्रम :
दिविजा वृद्धाश्रमाला धान्य व साहित्य भेट
कणकवली :
शिरगाव येथील श्री राम समर्थ ग्रामसंघातर्फे असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला धान्य व इतर आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. ग्रामसंघाला १०० महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम महिलांनी उत्स्फूर्तपणे राबवला. या ग्रामसंघात २५ गटांमधील ३०० महिला कार्यरत असून, जिल्हा व तालुका अभियान कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसंघाने गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे.
वृद्धाश्रम भेटीदरम्यान महिलांनी आजी-आजोबांशी संवाद साधून गहू, उडीद, कांदे, रवा, कुळीथ पीठ, चपाती पीठ, खाद्यपदार्थ, गावठी तांदूळ अशी विविध साहित्ये वाटप केली.
या कार्यक्रमाला शिरगाव प्रभाग समन्वयक अभिजित चव्हाण, प्रभाग व्यवस्थापक रसिका कुवळेकर, ग्रामसंघ अध्यक्ष चंद्रलेखा तावडे, सचिव अपूर्वा तावडे, कोषाध्यक्ष भावना कदम, समुदाय संसाधन व्यक्ती पूर्वा सावंत, दीपाली घाडी, संजना साटम, संजना तावडे तसेच ग्रामसंघातील अन्य महिला उपस्थित होत्या.
