You are currently viewing ठाकरे गटाचे माजी सहसंपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाचे माजी सहसंपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाचे माजी सहसंपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

कणकवली

ठाकरे शिवसेना गटाचे माजी कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. कणकवली शिवसेना कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला.

शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी शंकर पार्सेकर यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. श्री.पार्सेकर यांनी गेली अनेक वर्षे शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली संपर्कप्रमुख पद सांभाळले होते. शिवसेना पक्षफुटीनंतर मात्र त्‍यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

शासनाच्या कल्याणकारी योजना या सर्वसामान्य घटकापर्यंत पोचविण्याचे काम महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. ते काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करत राहणार असल्याचे श्री.पार्सेकर यांनी सांगितले. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख हरेश पाटील, कणकवली तालुका प्रमुख भूषण परुळेकर, कणकवली शहर प्रमुख बाळू पारकर, खजिनदार भास्कर राणे, समन्वय सुनिल पारकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =