बृहन्मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी मसुरे चांदेर गावचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड झाली आहे. दादर मुंबई येथे असोसिएशनच्या वार्षिक सभेत तीन वर्षांसाठी सदर निवड जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष म्हणून श्री जी एस परब, नंदू राणे, विनोद मोरे, भगवान शिरसाट, नारायण मोरे, सौ नम्रता सावंत जनरल सेक्रेटरी पदी आशिष वर्तक तर जॉईंट सेक्रेटरी पदी प्रदीप पारकर (मालवण), संजय आंबरे, रामदास कदम, नयन पराडकर, सूर्यकांत चाफेकर, सूर्यकांत बिर्जे खजिनदार रतीकांत पराडकर तर सदस्य म्हणून सुगंध अलेकर, यमित कटीगर, उमेश पाटेकर, अशोक कसालकर, सीमा आंबरे, मुख्य सल्लागार सुरेश कदम तर कायदेशीर सल्लागार सौ अमृता आशिष वर्तक यांची निवड करण्यात आली आहे. मसुरे एज्युकेशन सोसायटी व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे डॉ दीपक परब हे अध्यक्ष असून उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले जी एस परब हे सुद्धा कांदळगावचे सुपुत्र असून भारतीय कामगार सेना महासंघ तसेच ओझर विद्यामंदिरचे ते चिटणीस तर मालवणचे प्रदीप पारकर हे भंडारी समाजाचे नेते असून भारतीय कामगार सेनेचे ते पदाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तीघांच्याही निवडी बद्दल अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी मसुरे सुपुत्र डॉ. दीपक परब यांची निवड
- Post published:फेब्रुवारी 14, 2021
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे कणकवलीत १० जानेवारीला भव्य आयोजन
ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे व जनकल्याण बहुउद्देशीय संस्था वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सडूरे शिराळे येथील सर्व वयोगटातील महिलांसाठी रक्त तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शब्दसखा, आम्ही बालकवी, बालकवी शाळा सिंधुदुर्ग यांच्या त्रिवेणी संगमातून पार पडला विविधारंगी कार्यक्रम
