You are currently viewing घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…

घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…

घाडीगांवकर समाज भवन निर्मिती निधी संकलन सुरु…

सिंधुदुर्ग विभागात पंचक्रोशी समित्या स्थापन करण्यास प्रारंभ..

कणकवली
क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने पंचक्रोशी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे .क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाज संस्था १ मार्च , २०२४ रोजी स्थापनेच्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . अशावेळी समस्त घाडीगांवकर समाज बांधवांनी सुसज्ज घाडीगांवकर समाज भवन बांधण्याचा संकल्प केला आहे . समाजभवनासाठी वागदे , तालुका कणकवली येथे यापूर्वीच जागा घेण्यात आलेली आहे . समाजभवन उभारणीमध्ये समस्त घाडीगांवकर समाज बांधवांना सहभाग घेता यावा यासाठी सिंधुदुर्ग विभागाने पंचक्रोशी प्रणित समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे .
नुकत्याच झालेल्या बैठका अनुसार देवगड तालुक्यात नारीग्रे आणि शिरगाव , मालवण तालुक्यात शिरवंडे तर कुडाळ तालुक्यात घावनळे येथे पंचक्रोशी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत . समाज भवन बांधणीसाठी निधी संकलन सहज आणि सुलभ व्हावे यासाठी तसेच समाज भवन निर्मिती कार्याबाबत प्रचार आणि प्रसार व्हावा हा यामागील हेतू आहे . सिंधुदुर्ग विभागातील उर्वरित पंचक्रोशी स्थापन करण्यासाठी लवकरच बैठका घेण्यात येतील . घाडीगांवकर समाज बांधवांना देखील पंचक्रोशी स्थापनेसाठी पुढे येण्याचे आवाहन सिंधुदुर्ग विभाग करत आहे. पंचक्रोशी प्रणित बैठकांच्यावेळी समस्त घाडीगांवकर समाज बांधवांमध्ये समाजभवनाबाबत उत्सुकता तसेच तळमळ यावेळी दिसली .
समाज भवन उभारणी कार्यामध्ये ज्या समाज बांधवांना सक्रिय सहभाग घ्यायचा आहे त्यांनी कृपया सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष सूर्यकांत घाडी ( ९४२२९६७३७४ ) किंवा सचिव प्रदीप घाडी (८३८१०४६६१९ ) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा प्रचार प्रसार समिती प्रमुख पत्रकार विजय गांवकर यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =