You are currently viewing रूजूल पाटणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपकडून मिळालेल्या संधीला दिले उत्तर

रूजूल पाटणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपकडून मिळालेल्या संधीला दिले उत्तर

सावंतवाडी :

भाजपच्या माध्यमातून येथील पाटणकर गॅस सर्व्हिसेस व स्टेपिंग स्टोन स्कूलचे संचालक रूजूल पाटणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रभाकर क्रमांक ९ मधून दाखल केला आहे. शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे यांच्या विरोधात त्यांची लढत रंगणार आहे.

रूजूल पाटणकर हे स्टेपिंग स्टोन स्कूल, सेवाभावी संस्था व गॅस एजन्सीच्या माध्यमातून परिसरात परिचित नाव आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपकडून त्यांना संधी देण्यात आली असून आज त्यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना सौ. ऋचा पाटणकर, रामप्रसाद पाटणकर, काश्मिरा पाटणकर, विद्याधर तावडे, राजू बेग आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा