मोदी सरकारच्या कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना मोठी ताकद दिली ; आमदार नितेश राणे

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाने शेतकऱ्यांना मोठी ताकद दिली ; आमदार नितेश राणे

कणकवली

सर्व नेत्यांनी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होऊन जो पाठिंबा दिला त्या बद्दल आभार व्यक्त करतांना आमदार नितेश राणे म्हणाले, आज मोदी सरकारने कृषी विध्येयका मुळे फार मोठी ताकद मिळाली आहे.देवगडचा हापूस गुजरातमध्ये, मध्येप्रदेश मध्ये विकाला जाऊ शकतो, दोडामार्गचा काजू देशाच्या कानाकोपऱ्यात विकला जाऊ शकतो.

महाराष्ट्र मधील ,कोकणातील शेतकरी या कृषी कायद्या मुळे फायदा होणार म्हणून आनंदित आहेत.या पूर्वी देवगडचा आंबा जेव्हा विकला जात नव्हता तेव्हा आम्ही डिमार्ट मध्ये नेला आणि विकला. शेतकऱ्यांना ताकत देणारा मोदी साहेबानी आणलेला हा कायदा आहे. माझ्या मतदारसंघातील सर्व शेकऱ्यांच्या वतीने मोदी सरकारचे आभार मानत आल्याचे आमदार नितेश राणे यांनी सभेच्या सुरवातीला प्रस्थाविकात मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा