*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सागर गोटे*
पंचअक्षरी
अंगणा मध्ये
नाजूक बोटे
खेळ खेळती
सागर गोटे
माणिक मोती
तसेच गोटे
चकचकीत
लहान मोठे
ओचा मारून
पाय पसरले
मैत्रिणीसवे
डाव रंगले
झेल झेलता
कवने गाती
काच बांगडया
किणकिणती
खेळ खेळता
अभंग पाढे
दृश्य केवढे
कविता वाटे
रमून गेली
खेळ खेळता
विसरलीस
दिवा लावता
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
