You are currently viewing लाखे वस्तीचा ठाम पाठिंबा दीपक केसरकरांना – कृष्णा लाखे

लाखे वस्तीचा ठाम पाठिंबा दीपक केसरकरांना – कृष्णा लाखे

६२ कुटुंब केसरकरांसोबत; समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढाईचा इशारा

सावंतवाडी :

दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण लाखे वस्ती असून ६२ कुटुंब त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी दिलेली घर आमच्यासाठी देणं आहे‌. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहोत, अशी माहिती लाखे समाजाचे नेते कृष्णा लाखे यांनी दिली. तर काहीजण समाजात राजकारण आणून फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. फसवणूक करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिमखाना येथील एका गटाने आपण भाजपसोबतच असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर लाखे वस्तीतील रहिवाशांनी आपली भूमिका मांडली आहे. श्री. लाखे पुढे म्हणाले, भाजप सोबत आम्ही नसून फसवे प्रवेश त्यांनी घेतले होते. ते लोक भाजपात नसून दीपक केसरकर यांच्यासोबतच आहेत.

पुर्वी असं राजकारण लाखे वस्तीत नव्हतं. मात्र, चलवाडी या व्यक्तीने आमच्या समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई देऊ. आमचा समाज दीपक केसरकर यांच्यासह असून उर्वरित जागेत घर बांधून देण्यासाठी श्री. केसरकर प्रयत्न करत आहेत. २५ घर मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे लाखे वस्ती दीपक केसरकर यांच्या सोबतच असल्याचे स्पष्टीकरण श्री. लाखे यांनी दिले.

यावेळी रासाई युवा कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, सचिव नितेश पाटील, विकी लाखे, सागर लाखे, अंकुश लाखे, संदीप लाखे, संजय खोरागडे, आरती खोरागडे, वैशाली पाटील, मिना पाटील, सावित्री पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा