You are currently viewing दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळावा : नॅब सिंधुदुर्गतर्फे २५ ऑक्टोबरला भव्य आयोजन

दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळावा : नॅब सिंधुदुर्गतर्फे २५ ऑक्टोबरला भव्य आयोजन

दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळावा : नॅब सिंधुदुर्गतर्फे २५ ऑक्टोबरला भव्य आयोजन

सावंतवाडी –

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) सिंधुदुर्गतर्फे दृष्टीबाधितांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नॅब सभागृह, नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. श्रीमती तृप्ती धोडमिसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री. विजय काळे तसेच इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षा मा. सौ. मृणालिनी कशाळीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नॅब संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत उचगांवकर आणि सचिव श्री. सोमनाथ जिगजीन्नी यांनी सर्व लाभार्थ्यांना या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व दृष्टीबाधित लाभार्थ्यांना येण्याजाण्याचा एस.टी. प्रवासखर्च संस्थेमार्फत दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

हा स्नेहमेळावा दृष्टीबाधित बांधवांसाठी परस्पर संवाद, प्रेरणा आणि आनंदाचा एक सुंदर उत्सव ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा