कुडाळ :
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, कुडाळ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कुडाळ तहसीलदार यांच्या कार्यालयातून बुधवारी याबाबतची अधिकृत जाहीर सूचना जारी करण्यात आली. ही प्राथमिक मतदार यादी कुडाळ तहसीलदार कार्यालयासह पं.स. कार्यालय तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे नऊ गट व पंचायत समितीच्या अठरा गणांमधील मतदारयादीवरील नावांबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास त्या लेखी स्वरुपात दाखल करण्यासाठी ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
संबंधितांनी निर्धारित नमुन्यात आपले अर्ज कुडाळ तहसीलदार यांच्याकडे सादर करावेत, असे सूचित करण्यात आले आहे. या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा अर्जाची दखल घेतली जाणार नाही, असे कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
