You are currently viewing तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालयाची विजयी घोडदौड

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालयाची विजयी घोडदौड

खेळाच्या मैदानावर वामनराव महाडिक विद्यालयाचा झेंडा उंचावला

विद्यार्थ्यांच्या खिलाडूवृत्तीने वामनराव महाडिक विद्यालयाचा लौकिक उजाळला

कणकवली:

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करून विद्यालयाचे नाव संपूर्ण तालुक्यात गाजवले. ही स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालय,कासार्डे येथे पार पडली.

यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
१४ वर्षाखालील मुले/मुली: सुराज प्रकाश गुरव १०० मी. धावणे प्रथम, गोळाफेक तृतीय, दुर्वा दीपक घाडी ४०० मी. धावणे द्वितीय,जानवी अनिल मालंडकर ६०० मी.धावणे द्वितीय, ४ x १०० रिले मुली- जानवी मालंडकर, दुर्वा घाडी, आरोही पवार,आरोही चव्हाण, हर्षिता तडवी,द्वितीय क्रमांक, ४ x १०० रिले मुले:सुराज प्रकाश गुरव,वेदांत नांदलस्कर, महंत तळेकर,विराट पवार,प्रथमेश तळेकर तृतीय क्रमांक

१७ वर्षाखालील मुले/मुली: साहिल स्वप्निल पवार ८०० मी. धावणे प्रथम,४ x ४०० रिले मुले- गौरांग शिंगे,चैतन्य भोवड, विशाल भोगटे,आर्यन कांजीर, सक्षम कांबळे, प्रथम क्रमांक,
४ x १०० रिले मुली- चैतन्या पवार, कस्तुरी सावंत,राणी वालरे,लक्ष्मी भिसे,अनुष्का टक्के,तृतीय क्रमांक,रुद्र आलव थाळीफेक तृतीय क्रमांक, यश घाडी ३००० मी.तृतीय क्रमांक

१९ वर्षाखालील मुले/मुली: प्रशिक कदम १०० मी.धावणे प्रथम,लांबउडी तृतीय,अवधूत तळेकर १०० मी.धावणे द्वितीय, साक्षी परब २०० मी.धावणे द्वितीय,प्रसन्न तळेकर ४०० मी. धावणे द्वितीय,तनश्री दुदवडकर ४०० मी.धावणे द्वितीय ४ x ४०० रिले मुले-प्रशिक कदम, अवधूत तळेकर,प्रसन्न तळेकर, हर्ष रावराणे, शुभम साटम,प्रथम क्रमांक,क्रॉस कंट्री ६ कि.मी. धावणे प्रेमांशू येझरकर तृतीय, हर्ष रावराणे चतुर्थ, ४ कि.मी. धावणे क्रॉस कंट्री मुली तनश्री दुदवडकर द्वितीय, ४ x ४०० मी. रिले खुशी पानवाला,मिताली खरात,शमिका कांबळे,तनश्री दुदवडकर,साक्षी परब तृतीय, शमिका कांबळे १०० मी.धावणे तृतीय.

या शानदार यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठीही गोष्ट प्रेरणादायी ठरली.या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच क्रीडा शिक्षक नवलसिंग तडवी यांच्या योग्य मार्गदर्शनाला आणि पालकांच्या सततच्या प्रोत्साहनालाही जाते.प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्रशालेचे मुख्य कार्य. अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, स्थानिक शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक,सर्व शाळा स. सदस्य,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा