You are currently viewing गळफास लावून होडावडा येथील वृद्धाची आत्महत्या

गळफास लावून होडावडा येथील वृद्धाची आत्महत्या

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा न्हयकरवाडी येथील रहिवासी केशव महादेव दळवी (वय 65 वर्षे) हे काल दुपारी 12.30 च्या सुमारास राहत्या घराशेजारी काजूच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे मयत स्थितीत आढळून आले.याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार डी. बी.पालकर, महिला पो. कॉ. रंजिता चौहान यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची माहिती महादेव श्रीधर दळवी यांनी पोलिसांत दिली आहे. पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.कॉ. रंजिता चौहान करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + seventeen =