You are currently viewing करुळ घाटात कोसळली दरड 

करुळ घाटात कोसळली दरड 

करुळ घाटात कोसळली दरड; वाहतूक विस्कळीत

वैभववाडी

तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला आहे. करुळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली. संबंधित यंत्रणेने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. शुक्रवारी मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करुळ घाटात सायंकाळी ५ वा. दरड कोसळली. दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. संबंधित यंत्रणेने दरड बाजूला केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच घाट मार्गात ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. चिखलमाती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा