You are currently viewing सेवा पंधरवडा अंतर्गत कुडाळ येथे शुक्रवार दि. 26 रोजी “वोकल फॉर लोकल” प्रदर्शन व विक्री

सेवा पंधरवडा अंतर्गत कुडाळ येथे शुक्रवार दि. 26 रोजी “वोकल फॉर लोकल” प्रदर्शन व विक्री

सेवा पंधरवडा अंतर्गत कुडाळ येथे शुक्रवार दि. 26 रोजी “वोकल फॉर लोकल” प्रदर्शन व विक्री

कुडाळ

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ मंडलच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त vocal for local च्या माध्यमातून स्वदेशी वस्तू,लघु उद्योजक व स्वयं उद्योग सहाय्यता गट यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ व उत्पादनाला ओळख मिळावी यासाठी एक दिवसीय विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग *मत्स व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेब ,जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री. प्रभाकरजी सावंत साहेब* यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई साहेब,भाजपा सिंधुदुर्ग महिला मोर्चा अध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगावकर, श्री. बंड्या सावंत, जिल्हा उपाध्यक्ष, सौ. संध्याताई तेर्से, जिल्हा उपाध्यक्ष,महिला मोर्चा जि.सरचिटणीस अदिती सावंत,उपस्थित राहणार आहेत.
तरी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, सरपंच, व सर्वच कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे अशी विनंती आहे.
*स्थळ : मराठा समाज सभागृह, कुडाळ*
*वेळ: गुरुवार दिनांक 26 रोजी सकाळी 11.00.वा.*

निमंत्रक:
सौ. आरती पाटील,महिला मोर्चा अध्यक्ष कुडाळ
सौ. मुक्ती परब, शहर अध्यक्ष कुडाळ.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

प्रतिक्रिया व्यक्त करा