You are currently viewing २nd मराठा (काली पांचवी) बटालियनच्या २५७व्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडीत माजी सैनिकांचा उत्साही स्नेमिलन सोहळा

२nd मराठा (काली पांचवी) बटालियनच्या २५७व्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडीत माजी सैनिकांचा उत्साही स्नेमिलन सोहळा

२nd मराठा (काली पांचवी) बटालियनच्या २५७व्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडीत माजी सैनिकांचा उत्साही स्नेमिलन सोहळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) –

भारतीय सैन्य दलातील २nd मराठा (काली पांचवी) या सुप्रसिद्ध बटालियनचा २५७ वा स्थापना दिवस सावंतवाडी येथील हॉटेल मँगो मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष कॅप्टन बाबु पडते यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन दीपक राऊळ यांनी केले.

कार्यक्रमात नुकतेच महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण बोर्डाचे सदस्य झालेले कॅप्टन कृष्णा परब यांनी सैनिकांसाठी असलेल्या विविध शासकीय सुविधा स्पष्टपणे सांगितल्या. तसेच कॅप्टन अनिल धाऊस्कर, सुभेदार रवींद्र पाताडे व अरुण गावडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमात निवृत्त ना. सुबेदार रवी गावडे, हवालदार महेश देसाई यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय वीर नारी व कॅनरा बँकेत कार्यरत बिडये मॅडम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अग्निवीर म्हणून नाव नोंदवलेली कुमारी कोमल राऊळ हिच्या आईवडिलांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

कॅप्टन बाबु पडते यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील अनुभव सांगत उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी कॅप्टन विनायक खोचरे, सूर्यकांत पालव, गोविंद सावंत, संतोष सावंत, सुशांत मलिक, बाबु लांभर, सत्यवान राऊळ, चंद्रकांत गावडे, श्रीमती लिंगवत मॅडम व त्यांचे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कॅप्टन विनायक खोचरे यांनी केले. समारोप मराठा स्फूर्ती गीत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने झाला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा