कणकवली :
भारतीय जनता पार्टीच्या कणकवली शहर मंडलाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी याबाबतची माहिती दिली. नव्या कार्यकारिणीत नव्या-जुन्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले.
खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयात संदीप साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या कार्यकारिणीची माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, संजना सदडेकर, कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, सुशील सावंत, प्रदीप गावडे आदी उपस्थित होते.
श्री. साटम म्हणाले, ‘सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने नव्या कार्यकारिणीत नवीन आणि जुने अशा दोन्ही प्रकारच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.’
नवी कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष सुशील सावंत, विजय भोगटे, चंद्रहास उर्फ बबलू सावंत, महिला उपाध्यक्ष : भारती देसाई, संजना सदडेकर, सरचिटणीस : लक्ष्मण गावडे, किशोर राणे, सचिव : प्रशांत सावंत, समीर प्रभूगांवकर, गणेश तांबे, महिला सचिव : सिद्धीका जाधव, राजश्री पवार, साक्षी वाळके, कोषाध्यक्ष : मंगेश तळगावकर तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये संजय शिरसाट, संजय सरवणकर, ऋतुराज तेंडोलकर, सुदाम तेली, आनंद शिंदे, श्रीकृष्ण घाडी, महेश शिरवलकर, संजय सावंत, भिवा वर्देकर, सुयोग माणगावकर, व्यंकटेश सारंग, रामचंद्र घाडी, सुधीर सावंत, बुलंद पटेल, अविनाश गिरकर, सुदर्शन नाईक, गौतम खुडकर, सुशील कदम, हेमंत परुळेकर, प्रज्वल वर्दम, सुनील घाडीगावकर, संजय ठाकूर, संतोष गुरव, राजन रासम यांचा समावेश आहे. महिला सदस्यांमध्ये वेदांगी पाताडे, आर्या वारंग, रुहिता तांबे, सुप्रिया कदम, अक्षया राणे, वैष्णवी सुतार, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, पूजा चव्हाण, गीतांजली कामत, सपना मेस्त्री, दिव्या पेडणेकर, स्मिता पावसकर, शोभा ढवळ, मयुरी मुंज यांचा समावेश आहे.
