You are currently viewing वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हटवले

वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हटवले

वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी हटवले

सावंतवाडी
जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे तलावाच्या काठावर लावलेले काही बॅनर उडून रस्त्यावर पडले. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्वरित पावती देत ही बॅनर्स उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली.

रस्त्यावर पडलेले बॅनर वाहनचालकांसाठी धोका निर्माण करू शकतात, म्हणूनच हे बॅनर लवकरात लवकर हटवणे गरजेचे होते.

या घटनेनंतर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी संबंधित बॅनर मालकांना आवाहन केले आहे की, “स्वतःचे बॅनर हवामानाच्या बदलांचा विचार करून सुरक्षितपणे लावावेत. कोणाच्याही जीवितास धोका होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी.”

या समाजहिताच्या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा