You are currently viewing वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या स्वयंसेवकां कडून “हनुमंत गड” येथे स्वच्छता व श्रमदान

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या स्वयंसेवकां कडून “हनुमंत गड” येथे स्वच्छता व श्रमदान

वेंगुर्ला

र्सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फुकेरी, दोडामार्ग येतील हनुमंत गड येथे वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या ३५ स्वयंसेवकांनी पूर्ण दिवसभर स्वच्छता व श्रमदान करीत इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यात खारीचा वाटा उचलला.

या ऐतिहासिक हनुमंत गडाच्या महाद्वारीवरील मातीचा ढिग बाजूला करण्यात आला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पायाभरणी साठी खोदाई करण्यात आली, पायाभरणीसाठी लागणाऱ्या दगडाची वाहतूक करण्यात आली. सह्याद्रीची श्रीमंती या गडाच्या अत्युच्य ठिकाणी जाऊन निश्चित अनुभवता आली आणि तो एक अविस्मरणीय अनुभव प्रतिष्ठान च्या ३५ स्वयंसेवकांनी अनुभवला असे प्रा. सचिन परुळकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा