*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना
*प्रेमात प्रकाश पडू दे*
जीवनी अंधार दाटला
अंगणी प्रकाश पडला
उभ्या जिवनात राजसा
जीव तुझ्यात अडकला
काळोख छळतो रात्रीला
लाभते ताऱ्याची संगत
वाट शोधता अंधारात
दाखवी काजवा रंगत
रोज होता अरुणोदय
दूर सारतो अंधाराला
सजना तुझ्यामुळे नवी
दिशा मिळाली संसाराला
दिसता आशेचा किरण
प्रयत्ने अंधार फिटला
मन मनाशी जुळवता
विवाद प्रेमात मिटला
नकोच अपेक्षा कुठली
संसार सुखाचा राहू दे
नको अंधाराची सावली
प्रेमात प्रकाश पडू दे
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर ,धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
