*ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांना “अहिल्या रत्न” पुरस्कार जाहीर*
*अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने पुणे येथे होणार सन्मान*
*वैभववाडी—*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्यावतीने 20 जुलै 2025 रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यातील 300 कर्तुत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका वैभववाडीतील सामाजिक क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांची *अहिल्यारत्न* या पुरस्कारासाठी निवड झाली असून विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शाल श्रीफळ मानाचा फेटा सन्मानचिन्ह मानपत्र देऊन सन्मान होणार आहे. या पुरस्काराचे आयोजन अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मा.प्रवीण काकडे यांनी केले आहे. महाराष्ट्रातून 300 कर्तुत्ववान महिलांचा सन्मान होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशाखा काळे यांची निवड झाली आहे.
पुणे येथे माहेर असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिदुर्गम भागामध्ये राहून पती नवलराज काळे यांच्या सहकार्याने त्यांच्या सोबतीने त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत विविध विषयांवर ती सौ काळे यांनी काम केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय करत आहे. शहरांमधील जन्म असून गावाकडे सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सौ काळे यांची गावातील युवतींना महिलांना प्रेरणा मिळत आहे अशा प्रकारचे उत्तम कार्य त्यांच्या हातून घडत आहे. शहरामध्ये जन्म होऊन सुद्धा अतिदुर्गम भागामध्ये येऊन आपला संसार व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या व्यवसायाकडे सुद्धा लक्ष देत चूल आणि मुल त्यापुढे जाऊन सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपलं नावलौकिक करणाऱ्या सौ काळे यांना हा पुरस्कार झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे.
