You are currently viewing अरे माझ्या… आरश्या !

अरे माझ्या… आरश्या !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

अरे माझ्या… आरश्या !

 

अरे माझ्या आरश्या

किती रे .. छळतोसं !

रूपडं बदलून टाकलं

उजव्याचं डावं केलसं

 

केसांना तू गिळलसं

दातांना तू चोरलसं मी नाहीरे…..अरे

तू म्हातारा झालास ..

 

मला तुझा कंटाळा आला

तू ही बोर झालास

पारा तुझा सदा चढलेला

तो ही आता तू..गमावलास

 

माझ्या उंचीचाच तू

अरे!माज किती करतोस

तुझं माझं नात उरलं नाही ..तरी तू

आईच्या कपाटाला चिकटलास

 

तुझ्या मनाच्या कोपऱ्यात

आई टिकल्या लावायाची

त्या हळव्या खुणा तू जपतोस

मला आई तुझ्यात दिसायची

 

कपाट आईच तुझं झालं

तुझ्यातच मी आईला बघून घेतो

छळायचं आहे तेवढं छळून घे!

आईला मी अजूनही लहानच दिसतो

आरश्या… ..वय तुझं झालं

तुझा पारा …उतरू दे!चढू दे..

आपल्या दोघांच्या.. आईकरता

मला लहान दिसू दे…!!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा