दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी , पालकांना त्रास
माजी सभापती सुरेश सावंत वेधणार पालकमंत्र्यांचे लक्ष
कणकवली :
कणकवली सेतु कार्यालयात शैक्षणिक प्रवेश सुरु झाल्यामुळे दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची विविध शालेय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी घालमेल सुरु आहे. माझ्या मुलाचे जे शैक्षणिक नुकसान झाले , तसे इतर विद्यार्थ्यांचे दाखला न मिळाल्यामुळे नुकसान होवू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती माजी सभापती सुरेश सावंत यांनी दिली.
माझा मुलगा 25 मे पासुन सेतु मधे ईडब्ल्यूएस या दाखल्यासाठी फे-या मारत होता,30 तारीख पर्यंत ते आजपर्यंत मी रोज न चुकता कणकवली तहसिल मधील सेतू कार्यालयात फे-या मारून सुदधा दाखला मिळाला नाही . माझ्या मुलाचा गुरुवारी 12वाजेपर्यंत फॉर्म भरायचा होता. पण वेळ संपली, माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे.
सेतु सुविधा कार्यालयात असणारा कर्मचारी वर्ग सर्वसामान्यांशी बोलताना उध्दट बोलत आहेत. वेळेवर दाखले दिले जात नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेची चौकशी व्हावी , अशी मागणी माजी सभापती सुरेश सावंत यांनी केली आहे.
पालकमंत्री यांनी तत्काळ दखल घेऊन योग्य त्या सूचना दिल्या
