*ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम लेख*
*आजची पर्यावरण स्थिती आणि उपाय*
पूर्ण उत्तर भारत महापुराच्या तडाख्यात सापडला . गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महापूर, भूस्खलन यामुळे धन, वित्त, जिवीत हानीमुळे त्रस्त झाले.
पर्यावरण हा एक कळीचा आणि कळवळीचा, चळवळीचा मुद्दा झाला आहे. विकासाच्या नावाखाली जे काही चाललेय त्यामुळे हवा,पाणी, माती,ध्वनी यात प्रदूषण वाढले जे मानवाला अपायकारक आहे. प्रदूषणामुळे हवेत कार्बन डायॉक्साईड वायूचे प्रमाण वाढल्याने पृथ्वी भोवतीचा ओझोन वायूचा थर कमी झाला आहे. ज्यामुळे जागतिक तापमान वाढ झाली आहे. त्याचे दृश्य परिणाम म्हणजे बर्फ वितळून त्याचे थर अनेक ठिकाणी पातळ झाले आहेत. हिमनद्यांना पूर येणे, बर्फ शिखरांचे स्खलन होणे ,ढगफुटी असे प्रकार वाढले आहेत.
चक्रीवादळे तयार होण्याची वाढण्याची कारणे म्हणजे तापमान वाढ, सागरी पातळी वाढणे.
जंगले मानवाने आपल्या स्वार्थासाठी नष्ट करणे, वणव्यात जंगल संपदा नष्ट होणे यामुळे हरित पट्टा कमी होणे. पर्यायाने ऑक्सिजन कमी होणे. ऑस्ट्रेलिया येथील वणव्यात सर्व जंगल स्वाहा झाले आहे.
औद्योगिक विकास जिथे आहे त्यांनी कायदे असूनही प्रदूषण नियंत्रणासाठी काहीही भरीव काम केले गेले नाही. कानपूर, चिपळूण, पिंपरी चिंचवड येथील परिस्थिती गंभीर आहे.
रसायने मिश्रीत पाणी इंद्रायणी, कृष्णा आदि नद्यांच्या पात्रात सोडले गेल्याने मासे व अन्य जलचर मरतात.
जल प्रदूषणामुळे शेतांचा पोत खराब होतो. माणसे विविध रोगांचे शिकार होतात.
ज्या यंत्रणा आहेत त्या भ्रष्टाचाराने बरबटल्या आहेत. दिखाऊ कार्यवाही केली जाते. हरीत लवाद देखील वेळकाढूपणा करते.
सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन लोकांचे केले होते. वनसंपदा नष्ट होण्याची वाचली. हिमालयाच्या वनांचे संरक्षण झाले. रेल्वे, रस्ते
विकास करण्यासाठी बेसुमार वृक्षतोड झाली.
गौण खनिज आणि अन्य मौल्यवान खनिजांसाठी खाणींचे उत्खनन केले जाते. गोवा, कर्नाटक राज्यातील खाणींकडे यादृष्टीने पाहिले पाहिजे.
-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर २१स्कीम १०,
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
मो. ९८९०५६७४६८
