अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मांगवली येथे सिंधुदुर्ग किसान मोर्चाच्या वतीने ३० मे रोजी गोमाता पूजन
वैभववाडी
भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दि. ३० मे रोजी सकाळी ११ वा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सुवर्ण सिंधू गीर गोशाळा मांगवली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी देशी गोमाता पूजन करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक शेती, पर्यावरण आणि आरोग्य विषयी महत्व व व्यवसाय संधी या विषयी गो भक्त तथा नैसर्गिक शेती तज्ञ् श्री महेश सावंत देवगड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष व भाजपा पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे यांनी केले आहे.
