You are currently viewing माऊली

माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माऊली*

 

जन्मदात्री ती माऊली

वात्सल्य ममता माया

कल्पवृक्षाची सावली

देई निरंतर छाया… .. १

 

रथाचे चाक एकच

नाहीच डगमगली

चार लेकरे ओटीत

आनंदात वाढवली… … . २

 

केले दिवस रात्रीचे

नाही हिशोब कशाचा

उत्कर्ष मुलाबाळांचा

दिन तिचा आनंदाचा… . . ३

 

वाहिला झरा प्रेमाचा

धडा दिला संस्कारांचा

जन्मदात्री ती आकाशी

चित्त तिचे पिल्लांपाशी… .. ४

 

बळ देण्यास पिल्लांना

मातृत्व लावी पणाला

चरणी जन्मदात्रीच्या

स्वर्ग असे वसलेला… … . ५

 

प्रेमस्वरूप ती आई

दरवळत राहिली

सुगंधात आम्ही सारे

न्हाऊन देवी पाहिली.. … … ६

 

वरदान अन्नपूर्णा

पांग तिचे फेडण्यास

जन्मच असे अपूरा

शुभआशिष घेण्यास… … … ७

 

अशीच असते आई

कशी व्हावी उतराई…

 

 

सौ. अनघा अनिल कुळकर्णी

पुणे. 🙏

९३२३४९१११३.

प्रतिक्रिया व्यक्त करा