You are currently viewing पुरणपोळीचे जेवण

पुरणपोळीचे जेवण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुरणपोळीचे जेवण* 

 

पुरणपोळीचे जेवण छान

जेवणाला लावले केळीचे पान

 

केळीच्या पानावर वरणभात

त्यावर साजूक तूप चम्मच सात

 

आजूबाजूला चार भाज्या

कोशिंबीर लोणचे चटण्या ताज्या

 

पुरणपोळी सोबत आमरस

श्रीखंड पुरी लाडू सरस

 

पापड कुरडाई भजी सार

जेवणात रुचीला त्यांचा आधार

 

सगळ्यात आधी जावयाचा मान

पंचपक्वान्नाचा जावयाला वाण

 

जावई रुसले सगळे अडकले

पुरणपोळी वर घातले तूप

बोटात अंगठी जावई चूप

 

पोट भरले जावई म्हंटले

सासूबाईचा स्वयंपाक घराची शान

पुरणपोळीचे जेवण छान छान…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा