*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडाl प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझा महाराष्ट्र*
माझ्या महाराष्ट्राचा मज सार्थ अभिमान
गुण गौरव गाताना राही सदा ताठ मान ..।।धृ।।
शिवबा सम आम्हास लाभला जाणता राजा
टिळक सावरकरांनी वाहिली हिंदुत्वाची ध्वजा
फुले आंबेडकर शाहू झाले सुधारक महान
गुण गौरव गाताना राही सदा ताठ मान…।।१।।
संतांची पावन भूमी पवित्र नद्यांचे पाणी
गड ,किल्ले सांगती इतिहासातून कहाणी
सह्याद्रीच्या पर्वतरांगा असे आमुची शान
गुण गौरव गाताना राही सदा ताठ मान …।।२।।
हुतात्म्यांची बलिदाने आम्ही जाणतो मनी
संस्कृती परंपरा जोपासतो अभिमानाने जनी
साहित्य संगीतात मिळाले शारदेचे वरदान
गुण गौरव गाताना राही सदा ताठ मान …।।३।।
गुणी कलाकार जन्मले भूषण या मातीचे
एकोप्याने इथे नांदती लोक विविध जातीचे
या मातीची लेक म्हणुनी मिळतो मज सन्मान
गुण गौरव गाताना राही सदा ताठ मान ….।।४।।
©️®️ डॉ.सौ. मानसी पाटील
मुंबई
