सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीच्या विद्यमाने शनिवारी सम्राट अशोक यांची 2319 वी जयंती समाज मंदिर सावंतवाडी येथे साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी तेंडुलकर या होत्या. प्रारंभी चंद्रशेखर जाधव यांनी स्वागत करून प्रस्तावित केले त्यानंतर भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमा चे पूजन मान्यवरांच्या करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर जाधव यांनी केले. यावे पत्रकार मोहन जाधव मीनाक्षी तेंडुलकर बुधाजी कांबळी या मान्यवरांनी सम्राट अशोक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू विशद केले व सम्राट अशोक यांच्या अशोक चक्रानेच देशा त पुन्हा बाबासाहेबांनी बौद्ध धम्म परिवर्तित करून भारत बुद्धमय करण्याच्या प्रयत्न केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेवटी मिलिंद नेमळेकर यांनी आभार मानले .यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडीत सम्राट अशोक यांची जयंती साजरी
- Post published:एप्रिल 6, 2025
- Post category:बातम्या / विशेष / सावंतवाडी / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कुडाळ पिंगुळी येथे नायब तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आमदारांची अपात्रता याचिका फेटाळली
जि.प. समाज कल्याण समितीची मासिक सभा गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी…
