*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पेपर नाहीत कुठले छापत*
रडलो होतो मी त्यावेळी
आजोबा होते झोपले अंगणी
रडले आभाळ मोठ्यांदा
त्यास कळली मृत्यू कहाणी….
असून एवढे मोठे भयंकर
धरणालाही गट्टम केले
ऐकून हुकूम वरुण राजाचा
पाऊस धारेस मुक्त सोडले ….
रात्री समयी येऊन चांदण्या
गाऊन जातात गोड गाणी
आभाळ घोरते तालासुरात
लोकांना वाटते ती विराणी….
कधीतरी त्याचे काय बिनसते
खाली फेकते गोट्या गार
पोरेटोरे भांड्यात जमवती
मानून मनापासून आभार….
विस्मयकारक रंग तयाचे
गडप करते कळप मेंढ्यांचे
कधी शीरता विमान पोटात
आवाज येतात गुदगुल्यांचे…..
कोण लावतो रंग तयाला
बदलत असतात क्षणाक्षणात
नाही दिसत कधी रंगारी
टेहेळणी करतो जरी अंगणात…
नाही उमजले गूढ अजुनही
नेहमी असते रंग बदलत
कुठले सरकार करते खर्च
पेपर नाहीत कुठले छापत….
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
