यंदाचा राज्यस्तरीय ‘संजीवनी लोककवी पुरस्कार 2024’ जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेवून सदर पुरस्कारासाठी शाहीर मनोहर पवार केळवदकर यांच्या साहित्य काव्य क्षेत्रातिल भरीव कार्य लक्षात घेवून त्याची निवड समिती व्दारे निवड करण्यात आली. संजीवनी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि. बुलढाणा (विदर्भ) ही महाराष्ट्रातील अग्रगण्य महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था असून या संस्थेव्दारे विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेचे कार्य पुर्ण महाराष्ट्रभर आहे. या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. निवृत्तीभाऊ जाधव असून त्यांनी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती निवडून त्यांना संस्थेव्दारे राज्यस्तरीय पुरस्कृत केले आहे. शाहीर मनोहर पवार केळवदकर ‘कवी लेखक’ असून त्यांच्या विविध कविता महाराष्ट्रात अनेक दैनिकात मसिकात रोज प्रकाशीत असतात. ते विविध साहित्य संमेलनात सहभागी असतात. साहित्य चळवळ व वाचन संस्कृति चालविणारे ‘उज्जैनकर फाऊंडेशनचे’ ते जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र व राज्याबाहेर गुजरात, गोवा, दिल्ली, येथे त्यांनी आपल्या काव्य रचना सादर केल्या आहेत. त्यांना यापूर्वीच पुणे येथे ‘जिल्हा भूषण’ पुरस्काराने गौरविले असून गोवा राज्यात ‘शाहीरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत ते मानधन प्राप्त शाहीर आहेत. त्यांनी शासनाच्या विविध कला महोत्सव उपक्रमात सहभाग नोंदविला असून ‘महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ पुणे’ यांच्या वतीने काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. तर चार इतर काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. कवीवर्य मंगेश पाडगावकर, नामदेव ढसाळ, शंतनु चिंधडे आदी सोबत मुंबई येथे काव्य वाचनाचा योग त्यांना प्रथमच प्राप्त झाला आहे. त्यांच्या भावी साहित्य सेवेला कार्याला हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
शाहीर मनोहर पवार यांना ‘लोककवी’ पुरस्कार जाहीर
- Post published:मे 8, 2024
- Post category:अमरावती / नाशिक / बातम्या / विशेष / सामाजिक / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून आरवली ग्रामवासियांना चतुर्थीची आगळी भेट!
विक्रांत सावंत यांच्या सहकार्यातून कारिवडे शाळेत थर्मल गनचे वाटप…
