*”न्यू स्टोरी टुडे” वेब पोर्टल ठाणे जिल्हा चीफ, दै.ठाणे वैभवचे पत्रकार, स्तंभलेखक, कवी ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम लेख*
*पृथ्वीचे पर्यावरण आणि माणूस. (समाजमन)*
आजपासून पन्नास वर्षानंतर किंवा शंभर वर्षानंतर या पृथ्वीचा विनाश होणार आहे. असे जागतिक तज्ञांचे मत आहे. पृथ्वीवरील यांत्रिकीकरण आणि शहरीकरणामुळे पर्यावरणात कार्बन व इतर विषारी वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्या रासायनिक प्रक्रियेमुळे पृथ्वीचे वातावरण तप्त होत चालले आहे. याचा परिणाम म्हणून जगातील हिम पर्वत हळूहळू वितळत चालले आहेत. त्यामुळे सागरातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पृथ्वीवर असलेला आजचा भूभाग जलमय होणार आहे. या सर्वामुळे पृथ्वीचा विनाश काळ जवळ आला आहे आणि म्हणून पन्नास किंवा शंभर वर्षानंतर या पृथ्वीचा विनाश होणार आहे. हे भाकीत वर्तवले जात आहे.
खरे पाहता पाच अब्ज वर्षांपूर्वी सुर्याची निर्मिती झाली. एक विशिष्ट खगोलीय विस्फोट घडून सूर्य हा तारा आकाराला आला. या सूर्याचे पुढील आयुर्मान अजून पाच अब्ज वर्ष असणार आहे. त्यामुळे खगोलीय दृष्ट्या पृथ्वीचेही आयुर्मान पाच अब्ज वर्षच असणार अशी शक्यता आहे परंतु माणसाच्या वैज्ञानिक व तांत्रिक विकास प्रक्रियेमुळे, पृथ्वीवरील तापमान, प्रदुषण दिवसेदिवस वाढत चालले आहे. या सर्व गोष्टीमुळे पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनचा थर पातळ होत चालला आहे. त्यामुळे सूर्याची तपदायक तथा अतिनील किरणे पृथ्वी तलावर येत चालली आहेत. (म्हणजे एक प्रकारची विषारी किरणे.) त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होऊ लागला आहे. यामुळे जगातल्या काही देशांमध्ये त्वचारोग वाढू लागले आहेत. पुढील काळात अशा अनेक रोगांची निर्मिती यामुळे होणार आहे. असे जगातील सर्व डॉक्टरांचे म्हणणे आहे. या सर्व बदलाचा अभ्यास करुन जागतिक तज्ञांनी पृथ्वी वाचवा ही मोहीम काढली आहे. त्यामुळे आपण पाच जूनला जागतिक पर्यावरणदिन साजरा करत असतो.
पण जागतिक पातळीवर घडणाऱ्या या घटनांचा परिणाम सामान्य माणसाच्या मानसिक जीवनावर होत नाही. त्यांच्या मनात पृथ्वीच्या विनाशाविषयी चिंता निर्माण होत नाही. पर्यावरण दिना दिवशी हा सामान्य माणूस, पृथ्वीच्या विनाशाची कारणनिमांसा ऐकतो. त्याच्यावर तो थोडा वेळ विचार करतो नंतर मात्र तो मनोरंजनाचा कार्यक्रम बघितल्याप्रमाणे, सारं काही विसरून जातो आणि म्हणतो, मी कुठे पुढची पन्नास, शंभर वर्ष जगणार आहे. या पृथ्वीचा विनाश माझ्यानंतर कितीतरी वर्षांनी होणार आहे. त्याची काळजी मी आज का करू! असे या सामान्य माणसाचे विचार असतात. हा विचार सर्वस्वी चुकीचा आहे.
माणसाने जरी जागतिक पर्यावरणाचा विचार केला नाही, तरी त्याच्या सभोवतालचे पर्यावरण बदललेले आहे. उन्हाळ्यात आज उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. हिवाळ्यात थंडीचे प्रमाण कमी जास्त होते. अधून मधून काही वेळेला उष्णतेचा पारा हिवाळ्यातही नको इतका चढतो. आता आपल्या भारतातही पाऊस कधीही मुसळधार बरसत असतो. पावसाचे हे प्रमाण कमी जास्त होत चालले आहे. म्हणजे एकंदरीत या सर्व भौगोलिक घटनांचा विचार करता जागतिक पर्यावरण आजमितीस धोक्यात आले आहे. आपल्या सामान्य जीवनावरही त्याचा परिणाम नाही म्हणता होतो आहे. त्यामुळे कुणालाही जागतिक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आपण ज्याप्रमाणे माणूस म्हणून इतिहास जाणून घेतो. त्या इतिहासाच्या अभ्यासातून समृद्ध होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण हिंदू धर्मीय म्हणून श्रीरामाचे, श्रीकृष्णाचे, आर्य चाणक्याचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत अथवा फालोअर आहोत असे म्हणतो तेव्हा आज प्रत्यक्षात श्रीराम, श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, शिवाजी महाराज आपल्यासाठी काय करतात. ते आपल्याला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत, तरी आपण त्यांना प्रेरणादायी विचारक म्हणून पुजतो. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून, त्यांच्या अंगभूत विचारांना आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारे आपण भविष्य काळाचाही विचार केला पाहिजे. आज आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खरोखर झाडे लावून, ती जगवली. परिसराची स्वच्छता ठेवून, रासायनिक क्रिया करणाऱ्या घटकांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावली. त्या अभियानात आपण सामील झालो, तरी आपण पर्यावरण रक्षक किंवा निसर्गप्रेमी होऊ शकतो. हे जर जगातल्या प्रत्येक सामान्य माणसाने केले, तर पृथ्वीवरील पर्यावरणाचे आपोआप रक्षण होईल. त्यावेळी विज्ञानविषयक मानवतावादी इतिहास आपल्याला कायम लक्षात ठेवेल. कारण या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक विवेकी माणूस, या पृथ्वी संस्थेचा विश्वस्त आहे. हा विचार करून, माणसाने आपले जीवन जगले पाहिजे. आपण या पृथ्वीवर फक्त अहिक सुख उपभोगायला आलो नाही, तर विवेक बुद्धीने पुढील पिढीला संपन्नतेचा वारसा देण्यासाठी आलो आहोत. हे माणसाने कायम लक्षात ठेवावे.
या बाबतीत आपण जर काही वैश्विक धर्मांचा विचार केला, तर त्या धर्मांमध्ये पुनर्जन्माला विशेष महत्व दिले आहे. त्यामुळे माणसाचा आजच्या काळात जर मृत्यू झाला, तर तो पुढील काळात पुन्हा जन्म घेऊन, कुठल्यातरी रुपात या भूतलावर येऊ शकतो. मग त्याच काळात या पृथ्वीचा विनाश झाला, तर तो आत्मा तडफडणार नाही का? याचा विचार आपण केला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण पृथ्वीवरील पर्यावरणाकडे पाहिले पाहिजे.
यातूनच आपल्या पृथ्वीचे आयुर्मान वाढणार आहे.
त्यासाठी पृथ्वीवरील पर्यावरण जगवा आणि हा पर्यावरणाचा वारसा पुढील पिढीला जशाच्या तसा देऊ या. यातच आपले माणूसपण आहे.
अँड. रुपेश पवार
9930852165
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-