*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एक संवाद*
*रूसवा ढगाचा*
*का रे ढगां ! का रे ढगां !*
वारा भेटे नभी ढगाला
म्हणे तयाला,
का रे ढगां ! का रे ढगां!
का रे तू रूसला?
सागराच्या तळाशी
का जाऊनी लपला?
ग्रीष्म गेला वर्षा आला
चल जाऊ आपण
पर्वतराजा मिठी मारायला
हिरवा हिरवा शालू नेसवू
धरणीमातेला
ओसाड झालं रान
नदी नाले ही आटले
सुकली ही धरणी आता
पशुपक्षी तहानले
पाने फुले फळे लावून
सप्तरंगात रंगवू धरणीला
वाट पाहे चातक नभी
कोकीळा गाई गाणे
कोकीळेच्या तालासुरात
अंगणी मोर नाचला
ऐकून वाऱ्याचे गाऱ्हाणे
ढग मोठ्याने हसला,
यंदा माझ्या आधी वारा
तू इतका उतावीळ का झाला?
रूसलो आहे मी
पण तू का रे फसला?
का नाही वाटे मज
पर्वता मारूनी मिठी
शालू नेसावा धरणीला
मृत्यूला कवटाळून वर्षावे
चिंब भिजवावे मातीला
सांग मजला रे वारा
माझा श्वास कुठे कोंडला
मानवाने विकासाकरिता
मला धुराड्यात लोटला
तोडूनी झाडी जाळून जंगले
हा शहरीकरणाच्या
नादात गुंतला
त्याने माझा श्वास रे रोखला
हे कसे कळले नाही तुला?
उगाच का म्हणतो मजला
का रे ढगा ! का रे ढगा!
का रे तू रूसला?
सागराच्या तळाशी
का जाऊनी लपला?
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.
*संवाद मिडिया*
⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕
डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/
*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*
📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-