You are currently viewing सर्कस

सर्कस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*सर्कस*

सर्कस आणि बालपण याचं घट्ट नातं आहे. गावातल्या मोठ्या मैदानात, साधारणपणे पावसाळा संपला की सर्कसचा तंबू पडायचा. आणि गावातल्या लहान थोर मंडळींमध्ये उत्साह संचारायचा. सर्कस मध्ये दाखल असलेले प्राणी कलाकार जसे की हत्ती अस्वले, माकडे वगैरे सर्कशीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर कधी कधी गावातूनही फेरफटका मारतानाही दिसायचे. गावात सर्कस आली आहे याची माहिती ठिकठिकाणी लागलेल्या जाहिरात फलकावरून आणि वाहनातून ऑडिओ स्वरूपातही आकर्षक रित्या होत असे. शिवाय सर्कसचा एकदा तंबू पडला की तो बरेच महिनेही चालत असे त्यामुळे सर्कस पहायची राहिली असे क्वचितच होते असे.

तो काळच असा होता की सर्कस हे महान मनोरंजनाचे साधन होते. त्यावेळी आजच्यासारखी मनोरंजनाची विविध प्रकारची साधने नव्हती. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, डिजिटल गेम्स काहीच नव्हते. मार्शल आर्ट्स, जिम्नॅस्टिक, एरोबिक्स, नृत्य, सिंह, हत्ती, अस्वल इत्यादी वन्य प्राण्यांना प्रशिक्षण देऊन विविध क्रीडा प्रकार सर्कस मध्ये दाखवले जात. ते गमतीदार आणि चित्त थरारक असत. संपूर्ण सर्कस मध्ये विचित्र चकचकीत कपडे घातलेलें आणि रंगवलेल्या चेहऱ्याचचे विदूषकाचे पात्र फारच धमाल उडवत असे. कधी हा विदूषक सर्व प्रकारच्या क्रीडा लीलया करायचा. कधी आपटायचा, कोसळायचा. रिंग मास्टरचा मार खायचा पण सतत उड्या मारत, हसत, हसवत प्रेक्षकांची प्रचंड करमणूक करायचा.

ट्रॅपीज् चा गेम बघताना तर काळजाचे ठोके चुकायचे. एक चाकी सायकलवर तोल सांभाळत डोक्यावर अनेक कपबशा रचणारी, चकचकीत कपडे घातलेली बालिका किंवा तत्सम पिरामिड्स तयार करणारे कलाकार पाहताना तर थक्क व्हायला व्हायचं. वाघाशी खेळ खेळणारा पिंजर्‍यातला रिंगमास्टर महान वाटायचा. काही अंतरावरून होणारे वाघ,सिंह यासारख्या वन्य प्राण्यांचे दर्शन म्हणजे केवळ जीव मुठीत घेणे म्हणजे काय याचा अनुभव देणारं असायचं. बँड आणि फ्लड लाइट्सने अधिकच अलौकिक वातावरण तयार व्हायचं.

सर्कस म्हणजे थेट परफॉर्मन्स. कोणत्याही गोष्टीचे जिवंत दर्शन. त्यामुळे सर्कस पाहणं हा एक अतिशय अनोखा आणि रोमांचक अनुभव असायचा.

तसा सर्कसचा इतिहास खूप मोठा आणि जुना आहे. “द ग्रेट इंडियन सर्कस” ही पहिली आधुनिक भारतीय सर्कस होती. एक कुशल,अश्वारुढ आणि गायक विष्णुपंत मोरेश्वर छत्रे यांनी सर्कस प्रथम भारतात आणली. पण त्यापूर्वीही सर्कस ही प्राचीन रोम पासून तयार केली गेली आणि जिप्सीं द्वारे युरोपात पोहोचली. रशियन सर्कसने सर्कस क्षेत्रात अत्त्युच्च स्थान पटकावलं.

सर्कस हे नुसतंच मनोरंजनाचे साधन नव्हतं तर ते लोकांच्या भावनांशी निगडित होतं. आज जरी सर्कस त्या जोशात अस्तित्वात नसली तरी सर्कस पहिल्याच्या आठवणी मात्र रम्य आहेत. आणि त्या काळात घेऊन जाणाऱ्या आहेत. आजही रॉयल सर्कस, जम्बो सर्कस अशा पाट्या वाचायला मिळाल्या की मन रोमांचित होते.

मेरा नाम जोकर या चित्रपटातून राजकपूरने पुन्हा सर्वांना सर्कसच्या दुनियेत नेले. तिथले आनंदाचे, दुःखाचे क्षण दाखवले. तेथील अत्यंत वेदनादायी, कठीण जीवन दाखवले.

सर्कस म्हणजे अवाढव्य जीवन प्रवाह आहे. आज मागे वळून पाहताना मनात तुलनात्मक विचार येतात. सर्कस कडे एक मनोरंजनाचे साधन म्हणून पाहताना सहजच आपणही आशाच एका सर्कसमधील एक भाग बनतो रिंगणात साहसी खेळ करणाऱ्या त्या समूहात आपण आहोत असे वाटते. रिंगणातला तो चित्रविचीत्र, मुखवटेवाला विदूषकही आपण आहोत का? असाही भास होतो. कारण जीवन जगत असताना आपणही असेच सर्कसवाले खेळ खेळत आलो आहोत. बॅलन्सींग, टाइमिंग, धाडस या तारांवरून आपणही जात आहोत आणि मग आपल्यातला एक विदूषक म्हणतो,

*कल खेलमे हम हो ना हो*
*गर्दीशमे तारे रहेंगे सदा*
*भुलेंगे हम भुलेंगे तुम*
*पर हम तुम्हारे रहेंगे सदा*

*जीना यहाँ मरना यहाँ*
*इसके सिवा जाना कहाँ*

राधिका भांडारकर

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा