You are currently viewing सर्जा-राजाचा सण

सर्जा-राजाचा सण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री वंदना पाटकरी लिखित अप्रतिम लेख*

 

*सर्जा-राजाचा सण*

*****************

 

*बैल पोळा आजचा सण आहे बैलांचा*

 

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्णजयंती, स्वातंत्र्याचा सण ,हे सारे सण साजरे झाले की पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो. *सर्जा-राजाचा सण. कर्नाटक महाराष्ट्रात या सणाला बैलपोळा* असे म्हणतात .दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर म्हणतात. बैलांप्रती म्हणजे *प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा* हा एक प्रमुख मराठी सण आहे

 

*आज पुंजा रे बैलाले*

*फेडा उपकाराचं देनं*

*बैला खरा तुझा सण*

*शेतकऱ्या तुझं र रिन*

 

अशा शब्दात बहिणाबाईंनी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे .खरोखर भारतासारख्या शेतीप्रधान देशात आणि येथील शेतकऱ्यांना बैलपोळा या सणास विशेष महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची पूजा करतात. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी बैलांचा थाट असतो. या दिवशी पूर्ण दिवस कामापासून त्यांना आराम मिळतो. बैलांचा हा सण साजरा करण्यास शेतकरी वर्ग फार आतुर व उत्साही असतात.

 

प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना सजवून पोळ्याच्या मिरवणुकीत घेऊन येतात .सायंकाळी सजविलेल्या बैलांची मोठ्या थाटात मिरवणूक काढतात. गावातील सर्व बैलजोड्या ढोल, ताशे वाजवत मिरवणूकित भाग घेतात. पोळ्याच्या सणाची गीते गायिली जातात.

 

या सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याचे तोरण बांधले जाते. सजविलेल्या बैलांना गावातील मारुतीच्या मंदिराजवळ नेले जाते. बैल व शेतकरी मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर हे बैल घरी आणून त्यांचे औक्षण करतात .गोड-धोड नैवेद्य म्हणून पुरण पोळी केली जाते ती बैलांना खाऊ घालतात. त्यात शेतीची विविध कामे करणारा बैल यांच्यासाठी आज *आरामाचा ,विश्रांतीचा* हा दिवस असतो .परंतु शेतकरी देखील आपला मित्र बैलांची या दिवशी मनोभावे सेवा करतात .त्याला दिवसभर कामाला जुंपले जात नाही. त्याला पूर्ण दिवसभर विश्रांती देतात.

 

शेतकरी दिवसभर त्याच्यामागे त्याची सजावट करणे, त्याला वेगवेगळ्या प्रकारची, सजावटीसाठी शिंगांना रंग रंग देणे, सजविले जाते. संध्याकाळी त्यांची मनोभावे पूजा आरती केली जाते. अशा पद्धतीने मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो

 

शेतकरीवर्ग आपल्या सर्जा राजा वर प्रेमाची उधळण करत असतात. प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करावे. हा *संदेश बैलपोळा* हा सण देतो. या सणाच्या निमित्ताने मुख्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आपुलकी वाढते ती आपण चिरंतर ठेवून शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे आपण सर्वांनी त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आपुलकी वाढवू या. मुक्या प्राण्यांना त्रास न देता त्यांना आनंदात ठेऊ या. त्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेऊ या.

*आजचा हा दिन*

*बैलाले आराम*

*करा प्राण्यांचा*

*माया सन्मान*…..

 

✍️✍️✍️✍️✍️🌈🌈🌈🌈🌈

***************

लेखिकेचे नाव-

*पाटकरी वंदना खुशाल*( शिक्षिका)

डॉ. व्ही. व्ही .रंधे

इंग्लिश मीडियम

स्कूल शिरपूर) ता.

शिरपूर जि. धुळे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*गुरुजनांसाठी हिरो ची खास ऑफर..*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

💥 *शिक्षकदिन विशेष ऑफर* 💥

 

खास आपल्या गुरुजनांसाठी हिरो वाहन खरेदीवर खास सवलत 😇😇

 

HF DLX/SPLENDOR/PASSION सिरीझ वर रुपये 2000/-

 

SUPER SPLENDOR/GLAMOUR सिरीझ वर रुपये 2500/-

 

SCOOTER/PREMIUM सिरीझ वर रुपये 3000/-

 

दिनांक 20/09/2023 पर्यंत 🗓️

 

आजच बुक करा..📝

 

🎴मुलराज हिरो, एम.आय.डी.सी. कुडाळ

 

📱9289922336 / 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा