You are currently viewing आदिशक्ती अंबाबाई

आदिशक्ती अंबाबाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या परदेशी समूहाच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री राजश्री राजन कांबळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आदिशक्ती अंबाबाई*
===============

आई माझी, अंबाबाई
दिसते मला, ठाई ठाई
महिमा कितीक सांगू बाई
उदो उदो गं अंबाबाई ,उदो गं अंबाबाई

नवरात्रीच्या नवमाळेसी
गर्जत येई जागरणासी
नवरंगाची करित उधळण
माय भवानी,मज तारण्यासी

नित्य आरती, भजन-पूजन
रास गरबा खेळी,सकळ जन
नऊ दिवसाच्या, नऊमाळी तुज
भक्त करिती दर दिवशी अर्पण

कधी होऊन सिंहावर स्वार
कधी सिंहासनी आरूढ होऊन
येई दर्शन देण्या,भाविका
होई भक्त धन्य,तुझे दर्शन पाऊन

करिशी दानवांचे तू मर्दन
रूप घेऊनी कालिकेचे
रक्षिले मानवा दैन्यापासून
उपकार अनंत आदिमायेचे

रणांगणी करी दैत्याचा संहार
अंबे तू येशी परतून माघारी
उदे गं अंबे उदे!च्या जयघोषाने
दुमदुमन जाई दशा-दिशा सारी

राजश्री राजन कांबळे
ऑस्ट्रेलिया
दि. ३०/०९/२०२२

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/

प्रतिक्रिया व्यक्त करा